आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका सेल्फीने या मुलीला बनवले फेमस, येऊ लागले लग्नाचे प्रपोजल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साइमा हुसैन ही सिम्बॉयसिसमध्ये डिझायनिंगची विद्यार्थिनी आहे. - Divya Marathi
साइमा हुसैन ही सिम्बॉयसिसमध्ये डिझायनिंगची विद्यार्थिनी आहे.
पुणे- आज अभिनेता शाहरुख खानचा जन्मदिन आहे. यानिमित्त आम्ही त्याच्या एका अशा फॅनची तुम्हाला माहिती देत आहोत की जी एका सेल्फीमुळे सोशल मीडियावर फेमस झाली. शाहरुखच्या सेल्फीत दिसलेल्या या युवतीचे नाव साइमा हुसैन असे आहेत. या युवतीचा फोटो काही तासातच इतका व्हायरल झाला की तिला लग्नाचे प्रस्ताव आले. तर काही जणांनी तिच्याबद्दल आपत्तीजनक कमेंट्सही टाकल्या.
 
असे दिले त्रास देणाऱ्यांना उत्तर
- मुळची जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरची असणारी साइमा ही 21 वर्षीय युवती सिम्बॉयसिस विद्यापीठातून डिझायनिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युऐशन करत आहे. 
- काही महिन्यांपूर्वी शाहरुख तिच्या कॉलेजमध्ये आला होता. त्यावेळी पुण्यातील या विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढली होती. 
- इंटरनेटवर साइमाचा फोटो आल्यानंतर त्यावर अनेक कमेंट्सही आल्या. काहींनी लग्नाचा प्रस्ताव दिला तर काहींनी तिच्यावर अश्लील कमेंट्सही केल्या.
- आपल्याबद्दल वाईट टिप्पणीमुळे मानसिक त्रास झालेल्या साइनाने याला चोख उत्तर देत एका मुलीचे स्केच काढले होते. त्याखाली तिने इंग्रजीत I'm more than just "a pretty face ( मी एक सुंदर मुलीहूनही जास्त काहीतरी आहे) असे लिहिले होते. 
- साइमाने सांगितले की, मला माझ्या मैत्रिणीकडून कळाले की मी इंटरनेटवर इतकी फेमस झाली आहे. मला पहिल्यांदा यावर विश्वास बसला नाही. पण नंतर मला मेसेज आणि फोन येऊ लागले. 
 
अशी आली शाहरुख खानच्या सेल्फीत
- साइनाने सांगितले की, माझ्या एका मैत्रिणीने मला या गर्दीत शिरण्यासाठी मदत केली. मी लकी होते त्यामुळे मी सगळ्यात पुढे उभी राहू शकले. त्यामुळेच मी सेल्फीतही झळकले.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...