आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरीत स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा रद्द; शेकडो उमेदवारांना केंद्रांवरून घरी पाठवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड - प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पिंपरी चिंचवड येथे स्टाफ सिलेक्सन कमिशनची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. प्रशासनाने ही परीक्षा अचानक रद्द केल्याने सर्वच विद्यार्थ्यांना तसेच घरी परतावे लागले आहे. या ठिकाणी तब्बल 200 ते 300 विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते.
 
ठरवलेल्या वेळेनुसार, रविवारी सकाळी विविध पदांसाठी एसएससीतर्फे परीक्षा आयोजित करण्यात आली होती. 10 ते 12 पर्यंत चालणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांना सकाळी 9 वाजता सेंटरवर बोलावण्यात आले होते. चार टप्प्यांत होणाऱ्या परीक्षेचे दोन टप्पे यापूर्वीच झाले होते. तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा रविवारी घेतली जाणार होती. पिंपरी चिंचवड़ मधील नागनाथ मारुती गडसिंग ज्युनिअर कॉलेजमध्ये ही परीक्षा होती. यासाठी नांदेड परभणी, लातूर, औरंगाबाद, बीड, राहुरी, नगर, श्रीरामपूर, यवतमाळ विविध ठिकाणांहून उमेदवार आले होते. मात्र, विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जमा झाले असताना सकाळी साडे आठच्या सुमारास प्रशासनाने ही परीक्षाच रद्द झाल्याचे कळवले. प्रशासनाने केवळ 10 टक्के मुलांना मॅसेज आणि ई-मेलद्वलारे परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिली होती. उर्वरीत 90 टक्के उमेदवारांना सेंटरवर आल्यानंतरच ही माहिती मिळाली. वेबसाइटवर सुद्धा परीक्षा रद्द झाल्याची माहिती 28 मे रोजी जाहीर करण्यात आली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...