आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ssc Exam Form Online Submission Start From 19 To 31 St Oct

दहावीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात, 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मार्च 2016 मध्ये होणा-या दहावीच्या शालांत परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सोमवारपासून (19 ऑक्टोबर) सुरूवात झाली आहे. यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांना अर्जात त्यांचा आधारकार्ड क्रमांक भरावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नवे परीक्षार्थी, पुनःर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार परीक्षार्थी व तुरळक विषय घेऊन उत्तीर्ण होणारे विद्यार्थी अशा सर्वांना ऑनलाइन अर्ज भरावे लागतील. विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.maharashtragov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरता येतील.
माध्यमिक शाळांना 19 ते 31 ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज नियमित शुल्कासह भरावे लागतील. विलंब शुल्कासह अर्ज सादर करावयाचा कालावधी हा 2 ते 10 नोव्हेंपरर्यंत असेल. माध्यमिक शाळांना 2 ते 7 नोव्हेंबरदरम्यान बँकेत चलनाद्वारे नियमित शुल्क भरावयाचे आहे, तर 16 ते 19 नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह चलन सादर करता येतील. तसेच 16 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या सादर करावयाच्या आहेत.
आवेदनपत्रे भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळांशी संपर्क साधावा, तर शाळांना काही अडचणी असल्यास त्यांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी खासगी विद्यार्थी म्हणून पात्र होण्यासाठी फॉर्म क्रमांक 17 भरला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. मार्च 2016 मध्ये होणा-या दहावी परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच त्यांचा आधार कार्ड क्रमांक भरावा लागणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्जातच वेगळा रकाना यंदापासून देण्यात आला आहे.