पुणे- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (मंगळवारी) सकाळी 11 वाजता जाहीर झाला. यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. निकाल आॅनलाइन उपलब्ध झाला आहे. गुणपत्रक 24 जून रोजी शाळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनुत्तीर्ण मुलांची 18 जुलैपासून होणार फेरपरीक्षा होणार असल्याची माहिती बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली.
राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. 91.46 टक्के विद्यार्थिनी तर 86.51 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 0.82 टक्क्यांनी घसरला आहे. विभागवार निकालात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. कोकणमध्ये 96.18 टक्के विद्यार्था उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूरमध्ये 83.67 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
यंदा राज्यातील 21 हजार 684 शाळांमधून 16 लाख 50 हजार 499 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 1 लाख 8 हजार 915 विद्यार्थी एटीकेटीमध्ये पास झाले आहेत. 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थांची संख्या 48 हजार 470 आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल 85.72 टक्के लागला आहे. राज्य मंडळाने एकूण 56 विषयांची परीक्षा घेतली होती. त्यापैकी 10 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या 32 आहे.
पुणे विभागात अहमदनगर अव्वल... 92.14 टक्के निकालअहमदनगर जिल्ह्यात 61272 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 56457 विद्यार्थी उत्तीर्ण तर 4814 अनुत्तीर्ण झाले. त्यात मुलींची संख्या सर्वाधिक आहे. 95.66 टक्के विद्यार्थिनी तर 89.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विभागवार निकाल...
-कोकण विभागाचा निकाल 96.18%
-कोल्हापूर विभागाचा निकाल 93.59%
- पुणे विभागाचा निकाल 91.95%
- मुंबई विभागाचा निकाल 90.09%
- औरंगाबाद विभागाचा निकाल 88.15%
- नाशिक विभागाचा निकाल 87.76%
- लातूर विभागाचा निकाल 85.22%
- अमरावती विभागाचा निकाल 84.35%
- नागपूर विभागाचा निकाल 83.67%
या संकेतस्थळावर उपलब्ध होईल निकाल> www.mahresult.nic.in
> www.sscresult.mkcl.org
> www.maharashtraeducation.com
> www.knowyourressult.com
हेही वाचा..