आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीचा निकाल शुक्रवारी (7 जून) दुपारी 1 वाजता जाहीर होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2013 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (7 जून) मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी बुधवारी ही माहिती दिली. तसेच आठवड्याभरानंतर विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेत गुणपत्रिका मिळतील.

निकाल पाहण्यासाठी क्लिक करा.. खाली दिलेल्या वेबसाइट्स
http://mahresult.nic.in, www.msbshse.ac.in, www.mh-ssc.ac.in, www.sscresult.mkcl.org, www.rediff.com/exams.


एसएमएसद्वारे- बीएसएनएल एसएमएसद्वारे निकाल मिळवता येईल. त्यासाठी बीएसएनएल महाराष्ट्र सर्कलला 57766 क्रमांकावर MHSSE असा मेसेज पाठवावा लागेल.