आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ST कर्मचा-यांना देशात सर्वात कमी पगार! आंध्रात दुप्पट-तिप्पट पगार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- देशभरातील सर्व सार्वजनिक वाहतूक महामंडळाच्या तुलनेत महाराष्ट्रातील एसटी महामंडळातील कर्मचा-यांना सर्वात कमी वेतन दिले जात असल्याचे पुढे आले आहे. ग्रामीण व सर्वसामान्यांचा रथ ठरलेल्या एसटीच्या कामगारांचे पगार सरकारी, निमसरकारी व इतर महामंडळांतील कामगारांपेक्षा अत्यंत कमी असून एसटी महामंडळ देशातील सर्वात कमी पगार देणारे महामंडळ ठरले आहे.
आंध्र प्रदेशातील एसटी कर्मचा-यांना महाराष्ट्र एसटी कर्मचा-यांपेक्षा सरासरी दुप्पट ते तिप्पट वेतन दिले जात आहे. आंध्र-तेलंगणातील एसटी कर्मचा-यांना नुकतीच तब्बल 44 टक्के पगारवाढ दिली गेली आहे. तर, एसटी कर्मचा-यांना 2012-2016 या कालावधीसाठी झालेल्या करारानुसार केवळ 10 टक्के वेतनवाढीस मान्यता देण्यात आली होती. जी फारच अपुरी व तोडकी ठरली. दरम्यान, त्याविरोधात महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने (इंटक) राज्यभर मतदान घेतले. त्यावेळी कर्मचा-यांनी विरोधी मतदान केल्याने 13 टक्केपर्यंत पगारवाढ देण्यात आली. परंतु 13 टक्के वेतनवाढ अपुरी असून तोट्यात असलेल्या एमएसईबीच्या कामगारांना 25 टक्के पगारवाढ देण्यात आली आहे हे विशेष. एसटी कर्मचा-यांच्या वेतनाबाबत मान्यताप्राप्त संघटनांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे कर्मचा-यांच्या हातात आतापर्यंत नेहमीच धोंडाच पडत आला आहे.
एसटी कर्मचा-यांनाही किमान 25 टक्के पगारवाढ मिळावी या मागणीकरिता नुकतेच (29 ऑक्टोबर) पुण्यात महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेसच्या वतीने (इंटक) आंदोलन केले होते. मात्र, सातवा वेतन आयोग लागू झाल्याशिवाय कोणत्याही स्वरूपाची वेतनवाढ देणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचा-यांचे पगार
स्वच्छक 3660-11977
सहाय्यक (यांत्रिक) 4350-14225
वाहक 4350-14225
चालक 4700-15367
पुढे तुम्ही पाहा, महाराष्ट्र एसटी, आंध्र एसटी व MSEB कर्मचा-यांच्या पगाराची तुलनात्मक आकडेवारी...