आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई सुंदरीसोबत त्याने केले असे वर्तन; त्यानंतर पोलिसांनी केले त्याला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पंजाबमधील हवाई सुंदरीसोबत एका मोठ्या हॉटेलमध्ये विचित्र घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हवाई सुंदरी आणि हॉटेल व्यवस्थापकाच्या तक्रारीवरुन हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. विमाननगर येथील एका हॉटेलात 27 जुलै रोजी ही घटना घडली होती. येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले की, गुरुवारी या हवाई सुंदरीने फिर्याद दिली होती.
 
महिलेसोबत नेमके काय घडले
- या महिलेने 27 जुलैला रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी या हॉटेलमध्ये चेक-इन केले. 
- त्यानंतर काही वेळाने या महिलेला इंटरकॉमवर फोन आला. फोन करणाऱ्याने अश्लील बोलण्यास सुरुवात केल्याने तिने याबाबत हॉटेल मॅनेजरला सांगितले.
- मॅनेजरने सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सचिन बर्गे नावाचा एक कर्मचारी या महिलेशी अश्लील बोलत असल्याचे लक्षात आले. 
- सचिनला आपले कृत्य उघड झाल्याचे लक्षात येताच तो तिथून पळून गेला. मॅनेजरने ही बाब पोलिसांना कळवली. गुरुवारी या महिलेनेही पोलिसांकडे फिर्याद दिली.
 
सचिनने यापूर्वीही केले आहे असे कृत्य
- सचिन बर्गेला अटक करण्यात आली असून कलम 354 (ड) व 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- सचिनने एअर हॉस्टेससोबत नुसतीच छेडछाड केली नाही तर तिला शिवीगाळही केली.
- सचिनवर यापूर्वीही अशा पध्दतीचा आरोप लागला आहे. 
बातम्या आणखी आहेत...