आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात स्टेट बँकेला आग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शहरातील टिळक रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला बुधवारी पहाटे अचानक आग लागली. यात बँकेतील सर्व फर्निचर, संगणक आणि इतर साहित्य जळून खाक झाले. मात्र महत्त्वाची कागदपत्रे तसेच सेफ कस्टडी सुरक्षित राखण्यात यश मिळाले.

बुधवारी पहाटे बँकेच्या शटरमधून धूर निघत असल्याची माहिती रस्त्यावर पांढरे पट्टे रंगवणा-या मुलाने अग्निशमन दलाला कळवली. यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोचले. जवानांनी प्रथम बँकेचे शटर तोडून आत कोंडलेला धूर मोकळा केला. त्यानंतर पाच बंब आणि दोन टँकरच्या मदतीने आग विझविण्यात पथकाने यश मिळवले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.