आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Corporate Minister Harshvardhan Pawar Comment On Ajit Pawar

VIDEO : अपशब्द वापरणा-यांना जागा दाखवून द्याः हर्षवर्धन पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती- आगामी विधासभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच सत्ताधारी व विरोधी पक्ष याच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. राज्याचे सहकारमत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता टीका केली आहे. आपल्या गुंडगिरी, खालच्या पातळीवर भाषण करून, शिव्या देऊन आपल्याला लोकांसमोर जायचे नाही. फक्त शिव्या देणे, अपशब्द वापरणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका पाटील यांनी यावेळी केली.

राष्‍ट्रवादी कॉंग्रेसबद्दल बोलताना सहकारमंत्र्यांनी, पक्षाचा इतिहास, आदर्श झिरो असून परंपरेविषयी न बोललेच बरं, अशा शब्दात अप्रत्यक्षरित्या केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावरही शरसंधान साधले. हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील कॉग्रेस पक्षाच्या वचनपूर्ती मेळाव्यात बोलत होते.

सन 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांकडून उभे केलेल्या प्याद्याने वजीराची भूमिका पार पाडत सहकारमंत्र्यांच्या इंदापूरात जेरीस आणले होते.

राज्यात मुख्यमंत्र्यांचे खंबीर नेतृत्व असून ते कोणाच्याही दबावाला बळी न पडता काम करतात. राज्यातील ग्रामीण भागातील शेतकर्‍यांसाठी कॉग्रेसने 30 ते 40 हजार कोटी रूपये खर्च करणे ही सोनिया गांधी व कॉग्रेस पक्षाची किमया आहे. आपल्याला राहुल गांधीच्या नेतृत्व मान्य करून त्यांना कॉग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान करायचे आहे, असा निर्धार सहकारमंत्र्यांनी व्यक्त केला. सोनिया गांधी यांच्या विजयाने देशातील कॉग्रेस मजबूत होईल. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने शपथपूर्वक कामाला लागले पाहिजे. अपशब्द वापरतात त्यांना जागा दाखवून द्या. इंदापूर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवण्याचा नाद केला नाही पाहिजे, असा टोला अजित पवार व जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय भारणे यांना लगावला. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बंडखोर प्याद्याला धडा शिकवण्याचे अवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

राज्यात एकत्रितपणे राज्यकारभार चालवत असले तरी राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये इंदापूर विधानसभा मतदार संघासाठी गेल्या काही वर्षापासून सत्तासंघर्ष सुरूच आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षासाठी अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी उपमुख्यमंत्री सतत प्रयत्नशील असतात. त्यातून गेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे बंडखोर उमेदवार व विद्यमान पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय भारणे हे आघाडी बिघाडी करत सहकार मंत्र्याविरोधात उभे ठाकले होते. त्यावेळी फक्त काही हजाराच्या मतांनी निसटता विजय हर्षवर्धन पाटील यांना मिळाला होता. आता 2014 च्या निवडणुकीत सहकार मंत्री धोका पत्करू इच्छित नाहीत. त्यासाठी इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. कॉग्रेसच्या वचनपूर्ती मेळाव्यासाठी कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष देवीदास भन्साळी, कमलाताई व्यवहारे, बसवराज पाटील, शरद रणपिसे आदी कॉग्रेस नेते उपस्थित होते.