आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्यांच्यामुळेच माझ्यावर पश्चात्तापाची वेळ, विनोद तावडे यांची खंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्यांच्यासाठी मी भांडलो, त्यांच्यामुळेच पश्चात्ताप करण्याची वेळ माझ्यावर आली आहे, असे खेदजनक उद्गार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना शनिवारी काढले. शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांच्या लाचखोरीच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.

शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी एका शिक्षकाच्या बदलीसाठी दोन लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी मंडळाच्या आजी-माजी अधिकाऱ्यांवर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर तावडे म्हणाले,“ज्यांच्यासाठी मी भांडलो, ज्यांना अधिकार मिळावेत, यासाठी प्रयत्न केले, त्यांनीच भ्रष्टाचार केला. त्यामुळे यांच्यासाठी मी का भांडलो, असा प्रश्न मलाच पडला आहे. अर्थात थोड्यांनी गैरप्रकार केले म्हणून साऱ्यांनाच दोषी ठरवणे योग्य नाही. सर्वच भ्रष्ट नसतात. काही गैरप्रकार समोर आलेत पण म्हणून संपूर्ण यंत्रणा दोषी ठरवता येणार नाही, अशा शब्दांत तावडे यांनी मंडळांना अधिकार देण्याच्या निर्णयाचे समर्थनही केले. शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची शिक्षण मंडळे बरखास्त करण्याची तरतूद आहे. त्यानुसार राज्यातील शिक्षण मंडळांचे अधिकार काढून घेण्यात आले. मात्र, सरकार बदलल्यावर शिक्षण मंडळांना अधिकार देण्याबाबत खुद्द शिक्षणमंत्री तावडे यांनीच पुढाकार घेतला. त्यानुसार सर्व नाही पण काही अधिकार शिक्षण मंडळांना मिळाले होते. तरीही लाचखोरी आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आल्याने शिक्षणमंत्र्यांना पश्चात्ताप व्यक्त करण्याची वेळ आली.
बातम्या आणखी आहेत...