आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Government Employee Arrested For Taking Bribe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

50 हजारांची लाच घेताना पुण्यात कर्मचारी अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शेतजमिनीचा सातबारा क्षेत्राप्रमाणे मोजणी करण्यासाठी एक लाख 30 हजार लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी 50 हजार रुपयांची लाच स्वीकरणा-या पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथील एका भूमी अभिलेख कमर्चा-यासह एकाला लाचलुचत विरोधी पथकाने अटक केली. विष्णू दशरथ सोनटक्के व नितीन चंद्रकांत मिरचे अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मंगेश तुकाराम काशीद यांनी तक्रार केली आहे.

काशीद यांची मावळ तालुक्यात इंदोरी येथे वडीलोपार्जित शेतजमीन आहे. त्याची मोजणी करण्यासाठी त्यांनी मावळ भूमिअभिलेख उपअधीक्षक यांच्याकडे अर्ज केला होता. सोनटक्के याने मोजणी करण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती एक लाख 30 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी पहिला हप्ता 50 हजार रुपये मोजणीपूर्वी तर 80 हजार रुपये प्रत्यक्ष मोजणीवेळी देण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचत पथकाच्या अधिकाºयांना त्यांना लाच स्वीकारताना अटक केली.