पुणे- पुण्यात आणखी दोन अभिमत (डीम्ड) विद्यापीठांना मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे आणि एम. आय. टी. युनिव्हर्सिटी, पुणे अशी या विद्यापीठांची नावे असतील.
डीवाय पाटील आणि विश्वनाथ कराड हे राज्यात शैक्षणिक क्षेत्रातील सम्राट म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याच समुहाने सरकारकडे डीम्ड विद्यापीठासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार राज्य सरकारने यंदापासून लगेच म्हणजे 2014-15 या शैक्षणिक वर्षापासून मान्यता दिली आहे.
ज्या खासगी संस्था स्वत:ची गुंतवणूक करून उच्चशिक्षणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना उत्तम प्रतिचे व्यवसायाभिमुख शिक्षण देतील अशा संस्थांना स्वयंअर्थ सहाय्यीत विद्यापीठे ( डीम्ड युनिव्हर्सिटी) स्थापन करण्याची परवानगी देण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे.
(छायाचित्र : एमआयटी शैक्षणिक समुहाचा मुख्य कॅम्पस्)