आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Level Jwellers Association Morcha At Pune On 10 March

राज्यस्तरीय सराफा व्यापा-यांचा गुरूवारी पुण्यात मोर्चा, दुकान बंद आंदोलन सुरुच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्याच्या दागिन्यांवर लावण्यात आलेल्या एक टक्का उत्पादन शुल्काच्या विरोधात महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने पुकारलेले बंद आंदोलन यापुढे बेमुदत कायम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्यातील सराफ 10 मार्च रोजी पुण्यात मोर्चा काढतील, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.

सराफ असोसिएशनच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना रांका म्हणाले, 'सरकारने लावलेल्या उत्पादन शुल्काचा फटका देशभरातील पाच लाख व्यापारी 40 लाख कारागिरांना बसणार आहे. सरकारला जर महसूलच हवा असेल तर त्यांनी देशात दरवर्षी आयात होणाऱ्या 905 टन सोन्यावर कर लावावा. कर लावण्यास आमचा विरोध नसून उत्पादन शुल्काच्या जाचक अटी आमच्यावर लादू नये. सुवर्ण नियंत्रण कायद्यात यापूर्वीच 30 वर्षे आम्ही होरपळलेलो आहोत. ज्यांना विश्वासाने निवडून दिले त्यांनी आपला शब्द फिरवला आहे.
ब्रिटिश राज्यपद्धतीनुसार तोडा-फोडा राज्य करा' या नीतीनुसार जनतेची दिशाभूल करू नये. संघटित बहुराष्ट्रीय कंपन्यांना बाजारात आणून छोट्या व्यापाऱ्यांना मारण्याचे षड्यंत्र रचले जात आहे,' असा आरोपही त्यांनी केला. 'मेक इन इंडिया'नुसार ग्राहकांचे जुने दागिने भारतीय संस्कृतीनुसारच नवीन स्वरूपात बनवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी सचिवाकडे दोन हजार किलो सोने-
रांका म्हणाले, 'एका माजी सचिवाकडे दोन हजार किलो सोने सापडले. मात्र, आमच्याकडे मोठा सोन्याचा साठा नसतानाही आमची विचारणा केली जाते. मागील अनेक वर्षांत कितीतरी भ्रष्टाचाराची प्रकरणे झाली. त्यातील एकाही गुन्ह्यातील ऐवज परत मिळालेला नाही. राज्यभरात सन 2007 मध्ये 47 ठिकाणी सोन्याची दुकाने फोडून शेकडो किमतीचा माल लुटला गेला. त्यातील मालही परत मिळालेला नाही.'