आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजितदादा, तुमच्यासाठी नव्हे पण वहिनींसाठी फाइलचे बघतो -म्हणाले विनोद तावडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजित पवार आणि त्‍यांच्‍या पत्‍नी सुनेत्रा पवार. - Divya Marathi
अजित पवार आणि त्‍यांच्‍या पत्‍नी सुनेत्रा पवार.
बारामती- ‘माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहाेत्सवी वर्षानिमित्त सरकारी खर्चातून बारामतीत विज्ञान प्रदर्शन अायाेजित करण्यास शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी मंजुरी दिली अाहे,’ अशी माहिती खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. इतकेच नव्हे, तर या प्रदर्शनासाठी लागणाऱ्या ३० लाख रुपयांचा सरकारी निधी देण्याचे अापल्या विनंतीवरून नव्हे, तर अापल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विनंतीवरून तावडेंनी मान्य केल्याचेही अजितदादांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर टीका करून सत्तेवर अालेल्या भाजप सरकारचे सुरुवातीपासूनच शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांशी ‘सलाेख्याचे’ संंबंध असल्याचे उभ्या महाराष्ट्राने अनुभवले अाहे. यातूनच घाेटाळ्याचे अाराेप असलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री अजित पवार सुनील तटकरे यांच्यावरील चाैकशी कारवाई रखडली असल्याचा अाराेप राजकीय वर्तुळातून केला जात अाहे. शरद पवार यांचे अमृतमहाेत्सवी वर्ष असल्याने सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार कुटुंबीयांच्या वतीने राज्यभर विविध कार्यक्रम घेतले जात अाहेत.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीत ३१ जानेवारी राेजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे अायाेजन केले अाहे. मात्र, त्यासाठीचा ३० लाख रुपये खर्च राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने करावा, असा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात अालेला अाहे. शिक्षणमंत्री विनाेद तावडेंना खरे तर हे प्रदर्शन दुसऱ्या शहरात भरवायचे हाेते, मात्र अापण ते बारामतीलाच कसे खेचून अाणले ३० लाखांचा निधी कसा मिळवला, याची सुरस कथा अजित पवारांनी शुक्रवारी सांगितली. वृद्धाश्रमाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बाेलत हाेते. ‘विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन झाले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, शिक्षणमंत्री विनाेद तावडे, अजित पवार इतर नेते एकाच सरकारी विमानाने पुण्याला अाले हाेते. परतीच्या प्रवासाच्या वेळी बारामतीतील विज्ञान प्रदर्शनासाठीची ३० लाख रुपये निधीची फाइल शिक्षण मंत्रालयाकडे पडून असल्याची माहिती अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दादांना दिली.

पुढे वाचा, आणखी काय म्‍हणाले, अजित पवार...