आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कामगारांचा संपाचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - सहा महिन्यांत वेतन करार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही एस.टी. महामंडळ आर्थिक स्थितीचे कारण पुढे करत टाळाटाळ करत आहेत. शासनाने एसटी कामगारांना शासकीय कर्मचारी घोषित करावे, वेतन कराराची पायमल्ली करू नये अन्यथा संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे सचिव हनुमंत ताटे यांनी दिला.
एस.टी.च्या आर्थिक स्थितीस प्रशासन जबाबदार असून नव्या बसगाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाशांना सेवा देता येत नाही. तसेच पथकारापोटी सुमारे 100 कोटीचा बोजा एसटीवर पडत आहे. त्यामुळे टोलमधून एसटीला सुट दिल्यास नविन बसगाड्या घेता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शासन राज्यातील प्रवाशांना वेगवेगळ्या प्रवास भाड्यातील सवलतीपोटी एसटीचे सुमारे 1689 कोटी देणे लागते. त्यापैकी 200 कोटी रूपये बिनव्याजी कर्जरूपाने शासनाने एसटीला दिले आहेत. ही रक्कम समायोजित करावी. तसेच उरलेली रक्कम ही एसटीला अदा करावी. त्यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, असा दावाही ताटे यांनी यावेळी केला.