आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stephen Fleming Re unites With Dhoni As Pune IPL Coach

IPL: पुणे संघाच्या प्रशिक्षकपदी स्टिफन फ्लेमिंगची निवड, धोनीची शिफारस!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टिफन फ्लेमिंग व धोनी - Divya Marathi
स्टिफन फ्लेमिंग व धोनी
पुणे- न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग यांना आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सत्रासाठी पुणे संघाच्या प्रशिक्षकपदी निवडण्यात आले आहे. फ्लेमिंग आयपीएलमध्ये याआधी चेन्नई सुपर किंग्जचे कोच होते. चेन्नई सुपरकिंग्जच्या निमित्ताने धोनी आणि फ्लेमिंग यांचे आठ वर्षांचे जुने संबंध आहेत. आता कोच-कॅप्टनची चेन्नईची जुनीच जोडी पुण्याची मदार सांभाळेल.
पुणे फ्रँचायझी टीमने मागच्या महिन्यात ड्राफ्ट प्रक्रियेत महेंद्रसिंग धोनीला आपल्या गटात सामील केले. धोनीला मितभाषी फ्लेमिंग यांची कार्यपद्धती माहित असल्यानेच त्याने त्यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते आहे.
स्टिफन फ्लेमिंग यांचे मुख्य कोच म्हणून मी संघात स्वागत करतो. फ्लेमिंग यांचा कोच म्हणून अनुभव आणि यश जबरदस्त आहे. खेळाडू म्हणूनही त्यांनी शानदार प्रदर्शन केले आहे. त्यांच्या अनुभवाचा आमच्या टीमला मोठा फायदा होईल असे पुणे संघाचे मालक संजीव गोयंका यांनी म्हटले आहे.