आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Still Not Fir Field Against Himayat Baig In Jihadi Material Distrubute Case

पुण्यात जिहादी साहित्याचे वाटप; बेगवर अद्याप आरोपपत्रच नाही !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- इंडियन मुजाहिदीन व लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी मिर्झा हिमायत बेग याला 2008 मध्ये पुण्यात जिहादी साहित्याचे वाटप करताना पोलिसांनी त्याच्या साथीदारांसह अटक केली होती. त्यांच्यावर बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हाही दाखल झाला आहे, मात्र याबाबत अद्याप आरोपपत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे जर्मन बेकरीतील आरोपी असलेल्या बेगला या गुन्ह्यातही काय शिक्षा होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.


या प्रकरणात बेगसह फिरोज मेहबूब पठाण (वय 32), इम्तियाज बाबूमियाँ शेख (30), अय्याज युसूफ खान (25, सर्व रा.पुणे), मोहंमद बिलाल गुलाम रसूल कागझी (27, रा.सूरत), नदीम मोहंमद सलीम शेख (22, रा.ठाणे), शब्बीर हुसेन मोहिद्दीन गंगावली (रा.कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यापैकी फिरोज पठाण हा बंदी घातलेल्या सिमी संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता आहे. भडक लिखाण करणे, सिमी संघटनेचा प्रचार करणे, संघटनेसाठी देणग्या गोळा करणे अशी कामे तो करत असल्याचे एटीएसने सांगितले. त्याच्याकडून जिहादी मजकुराची सध्या हे आरोपी जामिनावर सुटलेले आहेत. तर त्यांचा फरार साथीदार तौकीर ऊर्फ अब्दुल सुभान कुरेशी बॉम्बस्फोट प्रकरणात वाँटेड आहे.

धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप
हिमायत बेग याने जिहादी पुस्तके व सीडीचे वितरण करण्यासोबतच शब्बीर गंगावली याच्या मदतीने धर्स (धार्मिक प्रवचन) आयोजित करून जिहादविषयक प्रवचने देऊन अनेक युवकांच्या भावना भडकवल्या आहेत. त्याच्या उदगीर येथील घरातून एटीएसने जिहादी लिखाणाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणात अजूनही दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले नाही.