आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन थांबवा नाहीतर FTII मधून बडतर्फ करू- प्रशासनाचा विद्यार्थ्यांना इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या संचालक मंडळाचे अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीसह इतर काही मागण्यांसाठी गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांना एफटीआयआय प्रशासनाने इशारा दिला आहे. आंदोलन थांबवा अन्यथा संस्थेतून कायमचे बडतर्फ करू अशी धमकी संचालक डी. जे. नरेन यांनी दिला आहे. विविध मागण्यांसाठी एफटीआयआयमधील विद्यार्थी 11 जूनपासून आंदोलन करीत आहे.
एफटीआयआयच्या संचालक मंडळावरील नियुक्त्या केंद्र सरकारने जाहीर केल्यापासून गेली 35 दिवस एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. संचालक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्यासह राहुल सोलापूरकर, अनघा घैसास, नरेंद्र पाठक, हरीश गुप्ता या सदस्यांच्या नियुक्तीलाही विद्यार्थ्यांचा विरोध आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला चित्रपट क्षेत्रातील मंडळींनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तर, FTII च्या संचालकपदावरून फिल्ममेकर झानु बरुआ आणि सिनेमेटोग्राफर संतोष सिवान, अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी राजीनामा दिला होता. याचबरोबर ऋषी कपूर, अनुपम खेर, रणबीर कपूर यांनीही गजेंद्र चौहानांच्या निवडीला विरोध केला आहे. एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळाला आहे. देशातील विविध राजकीय पक्षांनीही विद्यार्थ्यांसोबत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहे. तरीही चौहान यांची नियुक्ती मागे घेतली जाणार नाही असे सरकारचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...