आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stope Chandrabhaga Polution, Court Ordered To State Pollution Control Board

चंद्रभागा नदीचे प्रदूषण रोखा, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला न्यायालयाचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना खडे बोल सुनावत हरित न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. आर. किनगावकर यांनी मंगळवारी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा नदीचे प्रदूषण तातडीने रोखण्याचे आदेश दिले.

विठ्ठल सहकारी साखर कारखाना चंद्रभागा नदीत मळी सोडून प्रदूषण करत आहे. नदीतील प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची याचिका सामजिक कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी अँड. असीम सरोदे यांच्यामार्फत दाखल केली होती. त्यावर प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना होत नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही योग्य कायदेशीर यंत्रणा राबवण्यात अपयशी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.


कारखानाच बंद ठेवा
प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कार्यान्वित करत नाही तोपर्यंत विठ्ठल साखर कारखाना बंद करावा. तसेच कारखान्याच्या प्रतिनिधींनी न्यायालयात हजर राहावे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही त्वरित विस्तृत माहिती देणारे प्रतिज्ञापत्र दाखल करावे. वारीच्या काळात सांडपाण्याच्या निचर्‍यासाठी केल्या जाणार्‍या व्यवस्थेसंदर्भात तसेच या कालावधीत किती अतिरिक्त कामगार कामाला लावले जातात, याचा अहवालदेखील सोलपूरचे जिल्हाधिकारी व पंढरपूर नगर पालिकेने सादर करावा, असे हरित न्यायालयाने बजावले.


फक्त 348 सफाई कामगार
आषाढी-कार्तिकीला लाखो लोक पंढरपूरमध्ये येतात. पंढरपूर पालिकेची यंत्रणा एवढय़ा मोठय़ा प्रमाणावरील लोकांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी कमी पडते. येथे पुरेशी शौचालये उपलब्ध नसल्याने लोक नदी प्रदूषित करतात. दीड हजार कामगारांची गरज असताना केवळ 348 कामगार पालिकेकडे आहेत. या कामगारांना हाताने विष्ठा उचलावी लागते. मानवी विष्ठा वाहतूक प्रतिबंधात्मक कायद्याची अंमलबजावणी पंढरपूर नगर परिषदेकडून होत नाही व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे, याकडेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.