आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन : चार पिलर पेलणार तीन लाख चाैरस फूट मंडप, सेल्फी पॉइंटसुद्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पिंपरी येथे १५ जानेवारीपासून सुरू होणारे ८९ वे मराठी साहित्य संमेलन एकमेवाद्वितीय करण्याचा चंग आयोजकांनी बांधला आहे. त्यामुळे संमेलनाच्या तयारीची पाहणी करणे, हा एक वेगळा अनुभव ठरत आहे. तब्बल तीन लाख स्क्वेअर फुटांचा मुख्य मंडप अवघ्या चार स्तंभांवर (पिलर) तोलला जाणार आहे. तसेच यंदा मुख्य मंडपातील व्यासपीठ हे बहुस्तरीय (मल्टिलेव्हल) असेल.

व्यासपीठीय कार्यक्रमांसाठी वेगळी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी निराळी मंचीय रचना केली गेली आहे. मंडपात तब्बल १३ एलईडी वॉल्स उभारण्यात येत असल्याने सर्व प्रेक्षकांना व्यासपीठावरील कार्यक्रमांचा उत्तम रीतीने आस्वाद घेता येणार आहे. नव्या पिढीचा विचार करून संमेलन परिसरात खास ‘सेल्फी पॉइंट्स’ देखील असणार आहेत. संमेलन मंडपाची उभारणी आणि अन्य व्यवस्थांची जबाबदारी अॅडव्हेंट इव्हेंट या संस्थेकडे असून संस्थेचे शिवप्रसाद पाटील यांनी ही माहिती दिली. एच ए कंपनीच्या मैदानावरील ४० एकरांचा परिसर संमेलनमय होणार आहे.

पिंपरीतील सुमारे ४० एकरांच्या परिसरावर संमेलननगरी उभारण्याची तयारी
- ७२०० चौरस फुटांचे भव्य व्यासपीठ
- ३ उपव्यास पीठे
- मुख्य मंडपात २० हजार आसनक्षमता
- डोळ्यांना सुखद अशी एम्बियंट प्रकाशयोजना
- प्रथमच एलईडी सीलिंग
- प्रवेशद्वारापासून ४० फुटांचा बंदिस्त आच्छादित वॉक वे
- वॉक वेच्या दुतर्फा १५ मान्यवरांचे पुतळे
- संमेलनस्थळाचा विमा
- पुतळ्यांपाशी, ग्रंथ-म्यूरल्सपाशी सेल्फी पॉइंट्स
- १५ एकरांचा वाहनतळ
- ग्रंथप्रदर्शनात १६ फुटांचे वॉक वे
- कविकट्ट्यासाठी ड्रेपिंग डिझाइन
सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न : डाॅ. पाटील
संमेलनस्थळावर सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण संमेलनस्थळाचा विमा उतरवण्यात आला आहे. तसेच संमेलनस्थळी सुरक्षेचे सर्व उपाय योजले आहेत. ५० सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक, फायर मार्शल यांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष डाॅ. पी.डी. पाटील यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...