आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेणीतरी नाकारलेली खासदारकी छत्रपती संभाजी महाराजांना : अजित पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - ‘काेणीतरी नाकारलेली खासदारकी भाजपने छत्रपती युवराज संभाजी महाराजांना दिली आहे. उत्तर प्रदेशात छत्रपती शाहूंना मान असून तेथील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना हे पद बहाल करण्यात अाले,’ अशी टीका राष्ट्रवादी कांॅग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेतृत्वावर केली. तसेच धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेकांनी आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला, यातूनच काहींना पदे मिळाली, असा अाराेपही त्यांनी केला.

बारामतीत रविवारी रात्री अायाेजित धनगर समाज मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी कांॅग्रेसचे अामदार नितेश राणे, अामदार प्रकाश शेंडगे, अामदार रामहरी रूपनवर, अामदार दत्तात्रय भरणे अादी उपस्थित हाेते.

या वेळी धनगर समाजातील भाजप नेत्यांनी आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगण्याचे आश्वासन दिले. तर इतर नेत्यांनी अाता धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाची काठी अजित पवारांच्या हातात देण्याचे अावाहन केले. मात्र ‘अाम्ही विराेधी पक्षात अाहाेत,’ असे सांगत पवारांनी या अांदाेलनाचे नेतृत्व हाती घेण्यास असमर्थता दर्शवली.

आरक्षण हा विषय संघाचा नाही : राणे
इंदू मिलमध्ये स्मारक उभारले जात अाहे. तर दुसरीकडे आंबेडकर भवन जमीनदोस्त करण्यात अाले. एकीकडे शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करायचे तर दुसरीकडे पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायचा, असे दुटप्पी काम महाराष्ट्रात सुरू आहे. मुख्यमंत्री बाेलतात जाेरात, मात्र कामे जाेरात हाेत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घटनेत आरक्षण हा विषय नाही. त्यामुळे आताचे सरकार आरक्षण देऊ शकत नाही, अशी टीका अामदार राणे यांनी केली.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...