आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; दौंड येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका 14 वर्षाच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडली आहे. अरमान जलील मण्यार (वय 14 वर्षे, रा. वडगावकर कॉलनी, दौंड, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
 
दौंड येथील वडगावकर कॉलनीत मित्रांसमवेत खेळत असताना अरमानसह त्याच्या मित्रांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात अरमान गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला दौंड येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु त्याची तब्येत अधिकच बिघडल्याने त्याला पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अरमानचा शनिवारी मृत्यू झाला. अरमान हा नववीत शिकत होता. भटक्या कुत्र्यांमूळे अरमानचा मृत्यू झाल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...