आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Ask Question Over Ram Mandir To Mohan Bhagwat At Pune

राम मंदिर न बांधल्याने गरिबांना जेवण मिळाले का?- मोहन भागवत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज पुण्यात आहेत. पुण्यातील माईर्स एमआयटी कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या सहाव्या भारतीय छात्र संसद परिषदेत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी ते येथे आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही दिली. यावेळी एका विद्यार्थ्याने मोहन भागवत यांना थेट राम मंदिराबाबत प्रश्न विचारला. मोहन भागवत यांनी समर्पक उत्तर दिले मात्र ते बचावात्मक पवित्र्यात दिसून आले.

भाजप व आरएसएस अयोध्येत राम मंदिर व्हावे या मताचे आहे पण अयोध्येत राम मंदिर बांधल्यामुळे देशातील गरिबांना जेवण मिळेल का असा सवाल विचारला. याला उत्तर देताना भागवत म्हणाले, अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे. आतापर्यंत राम मंदिर झाले नाही म्हणून गोरगरिबांना जेवण मिळाले का? असेही म्हणता येईल. हा प्रश्न केवळ मंदिर उभारण्याचा नाही. आपल्या संस्कृतीचा तो भाग आहे. भारत वर्षात काही आदर्श पुरुष होऊन गेले आहेत. त्यांचे स्मारक, मंदिर उभे राहिले तर त्यातून आपल्याला प्रेरणाच मिळते. आजच्या आधुनिक समाजासमोर अशा आदर्शांची उदाहरणे असणे गरजेचे आहे, असे उत्तर मोहन भागवत यांनी दिले.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्याने हा प्रश्न मोहन भागवत यांना विचारला त्याचे टाळ्या वाजवून कौतूक करण्यात आले तर मोहन भागवत यांनीही तेवढेच समर्पक उत्तर दिल्याने उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
राज्यघटना बदलली जाऊ शकते- मोहन भागवत
राज्यघटना जगण्याचा आधार नाही, ती बदलली जाऊ शकते. संविधान बदलता येते हे राज्यघटनेतच लिहले आहे. फक्त तो मार्ग संवैधानिक असायला हवा असं वादग्रस्तही विधानही सरसंघचालक मोहन भागवत यांनी यादरम्यान केले. भागवत म्हणाले, राज्यघटना बदलली जाऊ शकते, राज्यघटनेतच तशी तरतूद आहे. राज्यघटना ही व्यवस्था आहे पण तो जगण्याचा आधार नाही, तर तो समाजाचा स्वभाव आहे. दरम्यान, भागवत यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा राज्यघटना बदलण्याचा वाद पेटण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भागवतांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. भाजप, आरएसएसचा राज्यघटना बदलण्याचा डाव आहे पण आम्ही तो हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असे चव्हाण यांनी म्हटले आहे.