आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Balaji Munde Suicide At Pune University. News In Marathi

नेट-सेटमध्ये अपयश: नांदेडच्या बालाजी मुंडेची पुणे विद्यापीठात आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नेट-सेटमध्ये यश मिळत नसल्याने नांदेडच्या बालाजी भाऊसाहेब मुंडे या विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात अात्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस अाली.
बालाजी भाऊसाहेब मुंडे (वय २५, मूळ राहणार सावरगाव, ता. मुखेड, जि. नांदेड) पुणे विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असून त्याने दाेन वर्षांपूर्वी विद्यापीठातून एम. ए. अर्थशास्त्र केले आहे. त्यानंतर ताे स्पर्धा परीक्षा व नेट-सेटची तयारी करत हाेता. तो मंगळवारी शिवाजी पुतळ्याजवळ एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अाढळला. चतु:शृंगी पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरुण सावंत यांनी सांगितले की, नेट - सेटमध्ये अालेले नैराश्य व मानसिक ताण यातून अात्महत्या करत असल्याचे त्याने अात्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.