आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय विद्यार्थ्यांमध्ये आहे या खेळाची दहशत; असा खतरनाक आहे लाल बत्तीचा खेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपळे गुरव येथे शिकवणीच्या शिक्षिकेने अवघ्या 3 वर्षाच्या मुलाला लाकडी पट्टीने जबर मारहाण केल्याची घटना ताजी असताना कुदळवाडी येथे एक भयंकर प्रकार घडला आहे. नववी वर्गात शिकणाऱ्या 10 विद्यार्थ्यांनी मिळून लाल बत्ती या खेळाच्या माध्यमातून एका विद्यार्थाला जबर मारहाण केली आहे. राहुल रामकुमार पासवान असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो इयत्ता 9 वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घडली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल रामकुमार पासवान हा कुदळवाडी येथील सरस्वती इंग्लिश मेडिअम शाळेत इयत्ता 9 वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मात्र शुक्रवारी दुपारी बारा वाजता वर्गात अभ्यास करत बसलेल्या राहुलला वर्गाच्या दार, खिडक्या लावून त्याच्याच वर्गातील 10 विद्यार्थ्यांनी लालबत्ती म्हणत तोंडावर कोट टाकत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यात राहुलला मुक्का मार लागला. विशेष हा सर्व प्रकार झाल्यानंतर त्याने शिक्षिकेला याची माहिती दिली परंतु याकडे शिक्षिकेने दुर्लक्ष केले. या अगोदर देखील असे प्रकार झाल्याचे समोर आले आहे. मात्र शाळा प्रशासन हे अशा विद्यार्थ्यांच्या विरोधात कठोर पावल उचलत नाही. म्हणून राहुलच्या घरच्यांनी थेट पोलिस चौकीच गाठली आणि विद्यार्थांविरोधात तक्रार दिली.
 
राहुलला 10 विद्यार्थांची धमकी 
एवढे होऊन देखील पोलिसांसमोर राहुलला त्या 10 विद्यार्थांनी धमकी दिली. त्यामुळे अशा एखाद्या विद्यार्थ्यांचा घटनेत जीव गेल्यासच जाग येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस निरीक्षक औताडे यांनी शाळेत जाऊन विद्यार्थांचे समुपदेशन केले.
बातम्या आणखी आहेत...