आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात प्रवेश घेण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या विद्यार्थांची गळफास घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. एका घटनेत विद्यार्थाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. उज्ज्वल उमेश शहा (20, रा.दिल्ली)असे त्याचे नाव आहे. दुसऱ्या घटनेत महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तिचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. सागर बोऱ्हाडे असे या व्यक्तिचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वल दिल्लीहून पिंपरी चिंचवडमध्ये एमआयटी या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मित्रांकडे आला होता. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. अद्याप कारण अस्पष्ट आहे.

दुसऱ्या दुर्दैवी घटना अशी की, रुथा प्रकाश पंडित (वय-35, रा.कांबळे चाळ, दापोडी) ही महिला लोखंडी तारेवर कपडे वाळत घालण्यासाठी गेली असता तिला विजेचा शॉक लागला. तिला वाचवण्यासाठी सागर गौतम बोऱ्हाडे (वय-30, रा.कांबळे चाळ, दापोडी) हे पुढे आले. पण त्यांचा जोरदार विजेचा शॉक बसला. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेत रुथा पंडित जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...