आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेला जायची घाई जिवावर बेतली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे कॅन्टान्मेंट भागातील मांजरी रेल्वे गेट जवळ के. के. घुले विद्यालयात शिकणारा एक युवकास भरधाव डंपरची (एमएच १२ एचडी ४१६)धडक बसून ताे जागीच ठार झाला. ज्ञानेश्वर राजेंद्र सुरवसे (वय १६ ,रा.मांजरी, पुणे) असे मृत मुलाचे नाव आहे. शाळेला उशीर झाल्यामुळे त्याने मांजरी परिसरात एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली हाेती. सदर दुचाकी शाळेच्या दिशेने जात असताना, मांजरी रेल्वेगेटजवळ एका डंपरने दुचाकीस धडक दिली. त्यामुळे ताे खाली पडला व डंपरचे चाक ज्ञानेश्वरच्या डाेक्यावरून गेल्याने ताे मरण पावला. सदर घटनेनंतर डंपर चालक पसार झाला आहे. याप्रकरणी हडपसर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाेलिस उपनिरीक्षक बी.एस. डाेईफाेडे पुढील तपास करत आहे.
बातम्या आणखी आहेत...