आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरच्या तरुणाला 60 हजारांना लुटले व नंतर खाडीत फेकले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या लातूर येथील तरुणाला बेशुद्ध करून ठाण्यात नेऊन 60 हजार रुपयांना लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. निखिल गटागट असे या तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री निखिल हा लातूरहून पुण्याकडे निघाला होता.
रविवारी सकाळी स्वारगेट स्थानकावर उतरल्यानंतर तो होस्टेलवर जाण्यासाठी ऑटोमध्ये बसला. या वेळी त्याला एका अज्ञात व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून तोंडावर रुमाल टाकून बेशुद्ध केले. यानंतर इतर चार जणांनी त्याला एका कारमधून ठाण्याकडे नेले. तेथे त्यांनी निखिलजवळचे 60 हजार रुपये आणि दोन बॅग पळवल्या व त्याला तेथील खाडीत फेकून दिले.
याबाबत काही मच्छीमारांनी निखिलची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन निखिलला रुग्णालयात दाखल केले. वाशी पोलिसांनी हे प्रकरण डेक्कन पोलिसांकडे वर्ग केले. निखिलने रविवारी डेक्कन पोलिसांकडे जबाब नोंदवला. याबाबत पुढील तपास सुरू आहे.