आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन कॉलेज परिसरात गळफास घेऊन दोघांची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संग्रहित छायाचित्र)
पुणे- पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील एका माजी उत्तीर्ण विद्यार्थ्याने विद्यापीठ परिसरातच एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बालाजी मुंढे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील आहे. बालाजीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातून बालाजीने एमए केले होते. तो एमएची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
फर्ग्युसन कॉलेजच्या आवारातही तरूणाचा गळफास-
दरम्यान, पुणे विद्यापीठात बालाजी मुंढे या विद्यार्थ्याने विद्यापीठ परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी येत नाही तोच पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजच्या आवारातील झाडाला गळफास घेऊन एका 30 वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. परशुराम रोकडे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. परशुराम हा फर्ग्युसन कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या पांडवनगर भागात राहत होता. परशुरामने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस पुढील चौकशी करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...