आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेताच्या परिस्थित घवघवीत यश; वाचा आर्थिक दुर्बल, पण गुणांनी श्रीमंत विद्यार्थ्यांची यशोगाथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- गेल्या अनेक वर्षांपासून वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षण भुक भागवण्याचे कार्य पुनरुत्थान समरसता गुरुकुलम आश्रमाच्या वतिने करण्यात येत आहे. या आश्रमातील 17 पैकी 13 विद्यार्थी या वर्षी चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्वांची यशोगाथा इतरांना प्रेरणा देणारी आहे. 

अमोल सोमनाथ भालेराव, सचिन राठोड, नौशाद नजीर हुसेन यांच्यासह दहा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. अमोल भालेराव याला दहावीच्या परीक्षेत 67.60 टक्के गुण मिळाले आहेत. अमोल हा लहान असतानाच त्याच्या आई वडीलाचे निधन झाले. परिस्थिती अगदीच बेताची होती. अमोलच्या मोठया भावाने परिस्थितीशी दोन हात करत अमोल शिकवण्याचे ठरवले. पिंपरी चिंचवड येथील आश्रमात 4 थी मध्ये अमोलला प्रवेश मिळवून दिला. अमोलने दिवस रात्र अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. एक चांगला अभियंता बनायचे आहे असे अमोलने सांगितले. त्याचा मोठा भाऊ रिक्षा चालवून कुटुंबाची जबाबदारी संभाळत आहे.
 
सचिन राठोड देखील हा विद्यार्थी देखील हालकीच्या परिस्थितीतून वाटचाल करत दहावीत 63.80 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. सचिनला वडील नाहीत, आई मोलमजुरी करू संसाराचा गाडा चालवते. सचिन राठोड याला पारंपरिक कला आवडतात. त्याला एक नामवंद कलाकार होण्याची इच्छा आहे.
 
नौशाद नजीर हुसेन याची देखील अशीच कथा आहे. नौशादचे आई वडील हे मुंबई येथील ग्रँटरोड वरील फुटपाथ वर राहतात. नौशादने दहावी उत्तीर्ण करत 63.20 टक्के गुण मिळवले आहेत. आई वडिलांचा गळ्यातले आणि कानातले विकण्याचा फिरता व्यवसाय आहे. नौशादला भेटण्यासाठी येताना त्याचे आईवडील रेल्वेमध्ये साहित्य विकत येतात. नौशादचे प्राविण्य हे नावाजण्या जोगेच आहे.

डोंबारी खेळ करणाऱ्या एका अत्यंत गरीब घराच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. आपल्या परिस्थितीवर मात करत आयुष्याच्या या लढाईत तिने महत्वाचा टप्पा पार केला आहे. या गुणवंत विद्यर्थिनींचे नाव काजल जाधव असे आहे. तिने दहावीच्या परीक्षेत 47.80 टक्के गुण मिळवत ती उत्तीर्ण झाली आहे. काजल सुट्ट्यात डोंबाऱ्याचा खेळ करते आणि तिच्या आईचा संसाराला हात भार लावते.

या सर्वच प्रेरणादायी विद्यार्थ्यांची कहाणी आहे. याला कुठल्याच किंमतीत मोजता येणार नाही. विशेष म्हणजे कुठलेच आर्थिक बळ आणि वडिलांचा सहारा नसताना यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...