आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HBD अविनाश धर्माधिकारी: हे नाव आणि त्यातली जादू तुमच्याही मनाला स्पर्श करेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचा आज (2 ऑगस्ट) वाढदिवस. 1986 मध्ये ते भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते. फलटण येथे विभागीय उपायुक्त, रत्‍नागिरी आणि अमरावती जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सचिव, अशा महत्त्वाच्या पदांचा त्यांनी कार्यभार सांभाळला होता. एक दशक प्रशासकीय सेवा देऊन त्यांनी 1 मार्च 1996 मध्ये रोजी राजीनामा दिला.
 
अविनाश धर्माधिकारी यांनी एक दशक प्रशासकीय सेवा देऊन 1 मार्च 1996 मध्ये रोजी राजीनामा दिला. मात्र, त्यांच्यात लपलेला उत्तम मार्गदर्शक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी प्रशिक्षण संस्था स्थापन केली. ती म्हणजेच पुण्यातील चाणक्य मंडल परिवार.

सार्वजनिक काका पुरस्कार
धर्माधिकारी यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची देखल घेऊन पुण्यातील सार्वजनिक संस्थेने त्यांचा 2015 मध्ये 'सार्वजनिक काका पुरस्कार'ने गौरव केला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वाचकांसाठी खास माहिती घेऊन आलो आहे.

चाणक्य मंडल परिवाराच्या वास्तूत देशभरातून विद्यार्थी येतात. या वास्तूतून बहुतांश विद्यार्थी खूप सारी ऊर्जा घेऊन बाहेर पडतात. धर्माधिकारी यांचे एखादे सत्र ऐकल्यानंतर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... गलेलठ्ठ पगाराची नोकरीचा राजीनामा देऊन पुण्यात सुरु केले चाणक्य मंडल...
बातम्या आणखी आहेत...