आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'फर्ग्युसन\'ची नोकरी सोडून सुरू केली शिक्षणसंस्था, वाचा सिम्बायोसिसच्या डॉ. मुजूमदारांची यशोगाथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - देशातील एज्युकेशन हब अशी ओळख पुण्याने निर्माण केली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची बीजेदेखिल या पुण्यनगरीतच रोवली होती. तेव्हापासूनच शैक्षणिकदृष्ट्या पुणे हे नाव देशात आघाडीवर राहिले आहे. याच पुण्यात भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांना एकत्र आणून शिक्षणाच्या माध्यमातून सांसाकृतिक मिलाफ घडवून आणण्याचे काम केले ते डॉ. बळवंत शांताराम मुजूमदार यांनी. सिम्बायोसिस संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे शैक्षणिक कार्य पोहोचले. त्यांचा संपूर्ण प्रवासच थक्क करणारा आहे. 
 
डॉ. मुजूमदारांविषयी... 
डॉ. एस.बी.मुजूमदार यांचे पूर्ण नाव शांताराम बळवंत मुजूमदार. 31 जुलै 1935 रोजी कोल्हापुरातील गडहिंग्लज गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध वकील होते. गडहिंग्लजमध्ये त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोल्हापूर आणि पुण्यातून पूर्ण केले.
 
पुण्यात शिक्षण पूर्ण करत त्यांनी बॉटनीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर मायक्रोबायोलॉजीमध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून पी.एचडी मिळवली. 

डॉ. एस.बी. मुजूमदार हे फर्ग्युसन महाविद्यालयात बॉटनीचे विभागप्रमुख होते. सुमारे 20 वर्षे ते या पदावर होते. त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे 50 च्या वर शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी जीव शास्त्रावर आधारित काही पुस्तकेही लिहिली आहेत. पण निवृत्तीला 16 वर्षे बाकी असतानाच त्यांनी सिम्बायोसिस संस्था वाढवण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
 
मुजूमदार यांनी त्यांचा बंगला विकून आणि पेन्शनच्या पैशाचा उपयोग करून पैसा गोळा केला. गरीब विद्यार्थ्यांना वाजवी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतून शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय मुजूमदार यांनी घेतला. 

हेही वाचा... सायकलवरून घरोघरी दूध ते ऑनलाईन विक्रीपर्यंत, चितळे उद्योगाचा संघर्ष आणि यशाचा प्रवास!
 
मिळालेले पुरस्कार..
डॉ.एस.बी.मुजूमदार यांना त्यांच्या कार्यासाठी भारत सरकारने 2005 मध्ये पद्मश्री तर 2012 में पद्मभूषण या नागरी पुरस्कारांनी गौरवले. महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा पुण्यभूषण आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला पुरस्कारही त्यांना देण्यात आला. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, कसा झाला सिम्बायोसिसचा जन्म.. सिम्बायोसिस नावाचा अर्थ... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...