आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sugar Export Subsidise By 400 Rupees Raosaheb Danve

साखरेला 400 रुपये निर्यात अनुदान, रावसाहेब दानवे यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘निर्यात साखरेला प्रतिक्विंटल 400 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. माझ्या मंत्रालयाकडून यासंबंधीची फाइल कॅबिनेटपुढे गेली आहे. येत्या आठवड्याभरात यासंबंधीचा अध्यादेश निघेल’, अशी माहिती केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी 'दिव्य मराठी'ला दिली.

चारशे रुपये निर्यात अनुदानाचा निर्णय झाला असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. त्यावर आता शिक्कामोर्तबच झाले आहे. ऊसाचा एफआरपी देण्यास मदत व्हावी म्हणून कारखानदारांनी या अनुदानाची मागणी केली होती. दरम्यान, देशात तयार होणा-या साखरेला परदेशी साखरेची स्पर्धा होऊ नये म्हणून आयात साखरेवर २५ टक्के शुल्क लावण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.