आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर आयातीचे गौडबंगाल उघड करणार : शेट्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - खासगी साखर कारखानदारांचे हित साधण्यासाठी कच्च्या साखरेवरील आयात शुल्क कमी करण्याचा खटाटोप काही राजकारण्यांकडून झाला आहे. देशात कच्ची साखर आयात करणा-या कारखान्यांची यादी आपण लोकसभेच्या माध्यमातून सरकारकडे मागितली आहे. ती मिळताच या आयातीचे गौडबंगाल उघड करू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला.

देशातील साखर निर्यात करण्याच्या अटीवरच सरकारने कच्च्या साखरेवरील आयात शुल्क 30 टक्क्यांहून 10 टक्क्यांपर्यंत कमी केले. मात्र आंतरराष्‍ट्रीय बाजारात साखरेचे दर कोसळू लागताच देशात उत्पादित झालेली साखर मंत्र्यांचे वरदहस्त असणा-या खासगी कारखान्यांनी निर्यात न करता देशातच विकली. त्यामुळे साखरेचे दर दोनशे रुपयांनी उतरले. त्यामुळे देशातील साखर उद्योगाला मोठा फटका बसला. त्यामुळे अगोदरच अडचणीत आलेल्या सहकारी साखर कारखान्यांना उत्पादकांना ऊस दर देताना आर्थिक अडचणी आल्याचे राजू शेट्टी म्हणाले.