आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षांच्या मुलीला गळफास देऊन अाईची अात्महत्या, पिंपरी चिंचवडमधील धक्‍कादायक घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भाेसरीतील इंद्रायणीनगर येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील चार वर्षांच्या मुलीला अार्इनेच राहत्या घरात गळफास देत त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन अात्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस अाला.
 
देवश्री इसप्पन आणि  काैमुदी इसप्पन (२५) अशी मृतांची नावे आहेत.  इसप्पन कुटुंबीय मूळ तामिळनाडू येथील रहिवासी असून काैमुदी व तिचे पती शंकर हे काही वर्षांपासून भाेसरीतील इंद्रायणीनगर येथे वास्तव्यास आहेत. शंकर हे बुधवारी सकाळी कामावर गेले. त्यानंतर काैमुदी या मुलीला शाळेत साेडण्यासाठी जाणार हाेत्या. मात्र, नऊ वाजले तरी त्या मुलीस शाळेत घेऊन न गेल्याने शेजारची माहिला त्यांच्या घरी अाली असता हा प्रकार उघडकीस अाला. पती-पत्नीत काैटुंबिक वाद हाेते, त्या वादातूनच ही घटना घडली अाहे का? याचा पोलिस तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...