आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात महिला डॉक्टरचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू; आत्महत्या केल्याचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. इंदू डोंगरे आणि त्यांचे पती डॉ. शाम डोंगरे यांचे पुण्यातील सुखसागरनगर येथील गजानन क्लिनिक. - Divya Marathi
डॉ. इंदू डोंगरे आणि त्यांचे पती डॉ. शाम डोंगरे यांचे पुण्यातील सुखसागरनगर येथील गजानन क्लिनिक.
पुणे- सुखसागरनगर येथील गजानन क्लिनिकच्या चौथ्या मजल्यावरून पडून एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. डॉ. इंदू डोंगरे असे मृत्यू झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. इंदू डोंगरे आणि त्यांचे पती डॉ. शाम डोंगरे यांचे सुखसागरनगर येथे स्वत:चे गजानन क्लिनिक आहे. मागील काही दिवसांपासून इंदू मानसोपचारतज्ञाकडे उपचार घेत होत्या. या आजारपणाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. चौथ्या मजल्यावरुन पडल्यानंतर इंदू गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...