पुणे- नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नॅशनल क्राइम रेकाॅर्ड ब्युराेच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील अात्महत्यांच्या प्रमाणात माेठी वाढ झाल्याचे समाेर अाले अाहे. पुण्यातील कनेक्टिंग ही संस्था अात्महत्या प्रतिबंध व अात्महत्याग्रस्तांना अाधार देण्याचे काम करते. ‘काैटुंबिक समस्या, अाजारपण व लग्नासंदर्भातल्या समस्या यामुळे अात्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत अाहे,’ असा निष्कर्ष संस्थेच्या समन्वयक ज्याेत्स्ना बहिरट यांनी काढला.
बहिरट म्हणाल्या, ‘अात्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त असून अात्महत्येने मृत्यू झालेल्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त अाहे. मागील दहा वर्षांत अामची संस्था या विषयावर काम करत असून अात्महत्या प्रतिबंधासाठी २००८ पासून अाम्ही १८००- २०९- ४३५३ व ९९२२००११२२ या क्रमांकांवर हेल्पलाइनही सुरू केली अाहे. त्यावर अातापर्यंत अाम्हाला १२ हजार ७६४ काॅल्स प्राप्त झाले असून ज्यात ८० टक्के काॅल्स पुरुषांचे तर, २० टक्के काॅल्स महिलांचे हाेते.
हेल्पलाइनवर दर महिन्याला सुमारे १५०० ते २०० काॅल्स येतात. या लाेकांशी बाेलल्यानंतर त्यांच्या मानसिक ताणाचे प्रमुख कारण काैटुंबिक समस्या, नातेसंबंध, लैंगिक समस्या व अाजारपण असल्याचे अामच्या लक्षात अाले. मागील वर्षभरात अाम्ही ९६ अात्महत्याग्रस्तांच्या घरांना भेटी िदल्यानंतर असे लक्षात अाले की, अनेकांना त्यांच्या समस्येविषयी बाेलण्यासाठी कुठे जागाच मिळाली नव्हती.’
विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची चिंता
कनेक्टिंग या संस्थेच्या माध्यमातून िपयर एज्युकेशन कार्यक्रमाअंतर्गत पुण्यातील सहा शाळांतील ८ ते १० वी वयाेगटातील मुलांना, त्यांच्या मित्रांना अाधार देण्याचे काम केले जाते. या मुलांसाेबत काम करताना अभ्यास, काैटुंबिक समस्या तसेच मित्रमैत्रिणींचा दबाव या समस्या प्रामुख्याने िदसून येतात. या मुलांना जीवन काैशल्य व एेकण्याच्या काैशल्याबाबत प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे संस्थेच्या कार्यकर्त्या संगीता काटदरे व माया कांबळे यांनी सांगितले. देशातील काेणतीही व्यक्ती, अात्महत्याग्रस्त शेतकरी संस्थेच्या हेल्पलाइनवर दुपारी २ ते ८ या वेळेत फाेन करून माेफत मार्गदर्शन घेऊ शकते.