आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात फाेर्ज कंपनीतील अकाउंटंटची अात्महत्या, मालकावर गुन्‍हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - चाकणमधील फाेर्ज कंपनीतील अकाउंटंट नीलेश अशाेक गायकवाड (३२) याने एका हाॅटेलमध्ये विष घेऊन अात्महत्या केली. हा प्रकार साेमवारी उघडकीस अाला. तीन दिवसांपासून नीलेश मेदनकरवाडी येथील गंधर्व हाॅटेलमध्ये राहत हाेता. मात्र, दाेन दिवसांपासून खाेलीचा दरवाजा उघडत नसल्याने हाॅटेल व्यवस्थापनाला संशय अाला. त्यांनी दरवाजा उघडला असता अातमध्ये नीलेशचा मृतदेह अाढळला.
 
नीलेश याने अात्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात नमूद केले हाेते की,  फाेर्ज कंपनीचे मालक अमित कल्याणी यांना नीलेश याने १५ काेटी रुपये दिले हाेते. त्यापैकी साडेअकरा काेटी रुपये कल्याणी यांनी परत केले हाेते. मात्र, उर्वरित पैसे व नीलेशचे कमिशन असे चार काेटी दहा लाख रुपये देण्यास अमित टाळाटाळ करत हाेतेे. तर दुसरीकडे नीलेशने १५ काेटी रुपये उसने घेतलेला व्यक्ती उर्वरित पैसे लवकर मिळण्यासाठी नीलेशकडे तगादा लावत हाेता. त्यामुळे नीलेश यास नैराश्य अाले हाेते. दरम्यान, या प्रकरणी अमित कल्याणीवर अात्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला.
बातम्या आणखी आहेत...