आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्णांनगर येथे विवाहित महिलेची आत्महत्या; घरात कोणी नसताना उचलले टोकाचे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील पूर्णांनगर येथे एका 38 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पूजा प्रकाश पाटील असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरात कोणी नसताना हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
 
ही घटना दुपारी 1 च्या सुमारास समोर आली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या पूर्णानगरमध्ये विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. पूजा प्रकाश पाटील (वय. 38) असे महिलेचे नाव आहे. प्रकाश आणि पूजा यांना दोन मुलं आहेत. ही दोन्ही मुलं शाळेत गेल्यानंतर पूजा यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
 
दरवाजा उघडला नाही
दोन्ही मुलं हे दुपारी एक वाजता घरी आली, मात्र आई पूजा यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे मुलांनी दरवाजा बराच वेळ वाजवला, हेच पाहून शेजारच्यांनी आणि मुलांच्या शिक्षिकेने पूजा यांच्या मोबाईलवर संपर्क केला मात्र प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. त्यामुळे ही सर्व घटना समोर आली. पूजा यांचे पती प्रकाश पाटील हे दिल्ली येथे कामानिमित्त गेले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. निगडी पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...