आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये त्रिशंकू (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सन २०१२ च्या तुलनेत पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी झालेल्या मतदानात अल्प वाढ झाल्याचा फायदा कोणाच्या पारड्यात जाणार याबद्दल साशंकता आहे. दरम्यान, काही खासगी कंपन्या आणि राजकीय पक्षांनी मतदानोत्तर केलेल्या सर्वेक्षणामध्ये दोन्ही शहरांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतके बहुमत कोणत्याच पक्षाला मिळणार नसल्याचेही सर्वेक्षणात दिसले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेची हॅटट्रीक साधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला तरी दोन्ही पक्षांमधला फरक दहापेक्षा जास्त राहणार नाही. कॉंग्रेस तिसऱ्या तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकला जाण्याची शक्यता आहे. १६२ नगरसेवकांच्या पुणे महापालिकेत बहुमतासाठी ८२ चा आकडा पक्षांना गाठायचा आहे. १२८ नगरसेवकांच्या पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर बनवण्यासाठी ६५ नगरसेवक हवे आहेत. 
बातम्या आणखी आहेत...