आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्याचे चटके, पारा चाळिशीच्या दिशेने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ३५ टक्केच पाणीसाठा असल्याने शहरात पाणी कपात केली जात आहे. त्यामुळे हाॅटेलांमध्येही फुलपात्रातून पाणी दिले जात आहे. - Divya Marathi
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ३५ टक्केच पाणीसाठा असल्याने शहरात पाणी कपात केली जात आहे. त्यामुळे हाॅटेलांमध्येही फुलपात्रातून पाणी दिले जात आहे.
पुणे - फेब्रुवारीच्या मध्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली असून मंगळवारी राज्यातील अनेक गावांचे तापमान ३९ अंशांपर्यंत गेले हाेते. यंदाच्या हंगामातील हा पहिलाच उष्ण दिवस आहे. परभणी, सोलापूर जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणचे तापमान ३९ अंश नोंदले गेले. तर मराठवाडा, विदर्भात सर्वच ठिकाणच्या पाऱ्याने पस्तिशी ओलांडल्याचे दिसून आले. राज्यातले सर्वात कमी तापमान नाशिक येथे ११.६ अंश होते.

दिवसाचे कमाल तापमान चाळिशी गाठण्याच्या मार्गावर असताना रात्रीचे किमान तापमान अजूनही २० अंशांपेक्षा कमी आहे. दिवस-रात्रीच्या तापमानात सरासरी २० अंशांचा थेट फरक असल्याने किरकोळ ताप व इतर आजारांच्या लक्षणांमध्ये वाढ दिसली आहे. विषम हवामानामुळे डासांची पैदास वाढली असून त्यामुळे आजारांचा फैलावही वाढला आहे.

‘मध्य महाराष्ट्र व मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रही तापण्यास सुरुवात झाली आहे. तुलनेने कोकण, गोव्यातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. रात्रीची थंडी व दिवसाचा उन्हाळा त्रासदायक ठरत असला तरी द्राक्ष, कांदा आणि इतर फळबागांसाठी सध्याचे हवामान अनुकूल ठरले आहे. पुढचे चारही दिवस राज्यातले हवामान निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे रब्बी पिकांची सुगी विनाअडथळा सुरू राहील. ज्वारी, करडई, हरभरा पिकांच्या काढणी व मळणीचे दिवस सध्या आहेत. तूर्तास पावसाची शक्यता नसल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, इतर शहरातील तपामानमधील चढ-उतार