आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोहत्याबंदी कायदा लागू करण्यासाठी आळंदीत अधिवेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रात हजारो कत्तलखाने आहेत. केंद्र अणि राज्यात संस्कृतीचे रक्षण करणारे शासन सत्तेत आले असून त्यांनी विलंब न करता तातडीने गोवंश हत्या प्रतिबंधक अधिनियम कायदा लागू करावा. यासाठी राष्ट्रीय वारकरी सेना महाराष्ट्र आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने आळंदी येथे १९ नोव्हेंबर रोजी वारकरी महाअधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय वारकरी सेनेचे उपाध्यक्ष मारुती तुणतुणे व हिंदू जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट यांनी दिली.

घनवट म्हणाले, श्री संत ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आळंदी येथे १० व्या वारकरी महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्यासह मदरशांप्रमाणे वारकरी शिक्षण संस्था आणि वेदपाठशाळांना अनुदान द्यावे, पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण आदी तीर्थक्षेत्रे मद्य व मांसमुक्त करण्यात यावीत. पंढरपूर देवस्थान येथे भ्रष्टाचार करणाऱ्यांना कठोर शासन करण्यात यावे, धर्मांतर बंदी कायदा करण्यात यावा, जादूटोणा कायदा रद्द करण्यात यावा अादी विषयांवर अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.