Home »Maharashtra »Pune» Sunny Waghchaure The New Golden Man Of Pune

हा युवक घालतो कितीतरी किलो सोने, त्याच्याकडे आहे सोन्याचा बूट, सोनेरी कार, मोबाईल

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 01:00 AM IST

  • सनी वाघचौरे, गोल्डन बूट आणि गोल्डन कारसह.
पुणे- महाराष्ट्रात सोन्याचे वेड असणारे काही कमी नाहीत. कोणाकडे सोन्याचे शर्ट तर कोणी अंगावर काही किलो सोने घालून फिरतो. यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. या व्यक्तीचे नाव सनी वाघचौरे असे आहे. सनी आपल्या अंगावर कितीतरी तोळे सोने घालून फिरत असतो. सनी स्वत:ला सोन्याचा चाहता म्हणवून घेतो. त्याच्याकडे सोनरी मोबाईल आणि पादत्राणे देखील आहेत.
विवेक ऑबेरॉय आहे सनीचा मित्र
- सनीबाबत सांगण्यात येते की त्यांचा बॉलीवूडमध्ये चांगलाच दबदबा आहे. अभिनेता विवेक ऑबेरॉय हा सनीचा जवळचा मित्र असल्याचे सांगण्यात येते. ते एका चित्रपटात एकत्र झळकलेही आहेत. ते आपल्या मित्रसोबत कपिल शर्माच्या शोमध्येही झळकले आहेत.
- सनी आपल्या गळ्यात सोन्याची चैन, हातात सोन्याचे कडे, ब्रेसलेट आणि सोन्याने बनलेले घडयाळ घालतो.
- सनीकडे सोनेरी रंगांची ऑडी कार आणि सोनेरी बूट आहे.
- सनी सांगतो की, त्याला लहानपणापासून सोन्याची आवड आहे. त्यामुळेच आपण इतके सोने घालतो.
- पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारा सनी आपल्यासोबत नेहमी दोन बॉडीगार्ड घेऊन फिरतो.
- सनीचा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. अनेक राजकीय व्यक्तीसोबतही सनीचे जवळचे संबंध आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या उत्पन्नाबाबत प्रश्न उपस्थित करुन त्यांच्यावर टीकाही करण्यात येत आहे.
- सनीचा एक मित्रही त्याच्याप्रमाणे अंगावर सोने घालून फिरत असतो.
महाराष्ट्रात नाही गोल्ड मॅनची कमतरता
- सनीप्रमाणे महाराष्ट्रात यापूर्वीही गोल्ड मॅन झाले आहेत. यात दत्ता फुगे यांच्या नावाचाही समावेश आहे. दत्ता फुगे यांनी साडेतीन किलो सोन्याचे शर्ट बनवले होते.
- नाशिकला राहणारे पंकज पारिख हे सुध्दा आपल्या अंगावर 4.1 किलो घालतात.
- राष्ट्रवादीचे सम्राट मोझे हे देखील आपल्या अंगावर अनेक किलो सोने घालून फिरत असतात.
- शिवसेनेचे एक नेते अनूप स्वरुप हे देखील आपल्या अंगावर 2 किलोपेक्षा जास्त सोने घालून फिरत असतात. जगदीश गायकवाड हे देखील आपल्या अंगावर 2 किलोपेक्षा जास्त घालून फिरत असतात.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended