आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Superstar Rajnikant Invites In Sasawad For Marathi Sahitya Sammelan

सुपरस्टार रजनीकांत यांना सासवड येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शिवाजी गायकवाड म्हणजेच सुपरस्टार ‘रजनीकांत’ यांना सासवडला होणार्‍या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी खास निमंत्रण पाठवले आहे. मूळचे मराठमोळे असलेले रजनीकांत यांना हे निमंत्रण मिळाले का? आणि ते संमेलनाला येणार का? याबाबत मात्र उत्सुकता आहे.
निमंत्रक रावसाहेब पवार यांनी सांगितले, जेजुरीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेले मौडी (ता.पुरंदर) हे रजनीकांत यांचे मूळ गाव. त्याच परिसरात संमेलन होणार असल्याने रजनीकांत यांना निमंत्रण पाठवले आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही.