आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रूणहत्या म्हणजे मानवी हक्कभंग : न्यायमूर्ती मिश्रा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - स्त्री भ्रूणहत्या हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी येथे व्यक्त पुणे येथे व्यक्त केले. भारती विद्यापीठ - न्यू लॉ कॉलेजतर्फे आयोजित मानवाधिकार या विषयावर आयोजित न्यायमूर्ती पी. एन. भगवती तिसर्‍या आंतरराष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेच्या उद््घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असा व्याख्यानाचा विषय होता. कंपनी लॉ बोर्डाचे अध्यक्ष न्यायाधीश डी. आर. देशमुख, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सीनिअर अ‍ॅडव्होकेट मननकुमार मिश्रा, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजचे माजी अध्यक्ष महेश आठवले, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. मुकुंद सारडा या वेळी उपस्थित होते.

मिश्रा म्हणाले, देशात घटत्या स्त्रीजनन दराची चर्चा आणि चिंता मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे. स्त्री भ्रूणहत्या प्रामुख्याने दोन प्रकारात केली जाते. गर्भपाताच्या माध्यमातून माता आपल्या गर्भातील कळी खुडते. मानव मग तो स्त्री असो वा पुरुष आधी जगला पाहिजे, तरच त्याच्या हक्क वा अधिकारांचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे स्त्री भ्रूणहत्या हे मानवी मूलभूत अधिकारांचेच उल्लंघन ठरते. या उल्लंघनाला स्त्री आणि पुरुष दोघेही जबाबदार आहेत. स्त्रीला प्रतिष्ठा न देता, तिच्या मानवी हक्कांचेच संरक्षण न करता मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विविध मोर्चांमध्ये सहभागी होण्याचा दुटप्पीपणा करतात, याकडेही मिश्रा यांनी लक्ष वेधले.