आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supriya Sule Loksabha Campaign With Family At Pune

सुप्रिया सुळेंची मुले रेवती व विजय आपल्या वडीलांसह प्रचारात सहभागी, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी काल रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत पुण्यातील खडकवासला परिसरात आपल्या कुटुंबियांसह प्रचार केला. बारामती लोकसभा मतदारसंघात कात्रज, धनकवडी, वारजे व पश्चिमेकडील पुण्याचा बराच भाग जोडलेला आहे. हा भाग शहरी असल्याने सुळे यांनी आपले पती सदानंद सुळे, मुलगी रेवती व मुलगा विजय यांच्यासह प्रचार रॅली काढत प्रचार केला. यावेळी या परिसरातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुप्रिया सुळे याबाबत म्हणाल्या, आज खडकवासला परिसरात प्रचारात माझी दोन्ही व पती सदानंद सुळे यांनी देखील सहभागी झाले. त्याला स्थानिक नागरिकांचा चांगला पाठिंबा मिळाला. सर्वांनी मला एक कुटुंबातीलच एक अशी वागणूक दिली. मी या लोकांनाही नेहमीच आपले कुटुंब मानत आले आहे. मात्र, माझे पती व मुले सहभागी झाल्याने अधिक उत्साह वाढतो याचाच अनुभव मी आज घेतला.
पुढे छायाचित्रातून पाहा, प्रचारात सहभागी झालेली सुप्रिया सुळेंची मुले व पती...