आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोपर्डी घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी, आज न्याय मिळाला- सुप्रिया सुळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोपर्डीची घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी होती. त्या तीनही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावून न्यायालयाने महाराष्ट्र आणि देशातील सर्व महिलांना न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. न्यायालय आणि फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी प्रयत्न करणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचेही आभार मानते. आता या तीनही नराधमांना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, ही अपेक्षा व्यक्त करते असेही सुळे यांनी भावना व्यक्त केली आहे.

 

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून प्रकरणी तिन्ही नराधमांना बुधवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी फाशीची शिक्षा ठोठावली. जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 25, रा. कोपर्डी, ता कर्जत), संतोष गोरख भवाळ (वय 30, मूळ रा. खांडवी, हल्ली रा. कोपर्डी), नितीन गोपीनाथ भैलुमे (वय 26, हल्ली रा. पुणे, मूळ रा. कोपर्डी), अशी या गुन्हेगारांची नावे आहेत. निकालानंतर पीडितेचे आई-वडील व कोपर्डीच्या ग्रामस्थांनी पीडितेला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. निकालाच्या वेळी आरोपींचे वकील अनुपस्थित होते. निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात प्रचंड गर्दी झाली होती. निकालानंतर न्यायालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी झाली.

बातम्या आणखी आहेत...