आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया आणि सदानंद सुळे यांच्यात असे जुळले बंध रेशमांचेऽऽऽ,बाळासाहेब ठाकरेंच्‍या आहेत भाचसून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/बारामती- खासदार सुप्रिया सुळे या ज्‍येष्‍ठ नेते आणि महाराष्ट्राचे मुरब्बी राजकारणी शरद पवार यांच्‍या कन्‍या. ताईंनी महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणात स्‍वबळावर आपला ठसा उमटवला आहे. शरद पवार यांचा (आज 12 डिसेंबर) 75वा वाढदिवस आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्या सुप्रिया सुळे यांच्याशी संबंधित खास माहिती घेऊन आलो आहे.

शरद पवार राज्याचे मुख्‍यमंत्री असतानाही सुप्रियाताई एसटी बसने कॉलेजात ये-जा करत असत. पुण्‍यातून प्रकाशित होणार्‍या एका अग्रगण्‍य दैनिकात त्‍यांनी काही काळ नोकरीही केली. दरम्‍यान, त्‍यांची आणि सदानंद सुळे यांची ओळख झाली. पुढे दोघे लग्‍नाच्‍या बेडीत अडकले. सुप्रियाताई आणि सदानंद यांची पहिली भेट कुठे झाली, ताईंचे कॉलेज जीवन कसे होते, याची रंजक माहिती....

असे गेले सुप्रियाताईंचे बालपण
शरद पवार यांचे प्रतिभाताईंशी लग्‍न ठरले, त्‍यावेळी त्‍यांनी एकच अट घातली होती. ती म्‍हणजे, आपल्याला एकाच मूलं हवं. मग ते मुलगा असो की मुलगी. 30 जून 1969 रोजी पुणे येथे सुप्रियाताईंचा जन्म झाला. त्‍या एकुलती एक मुलगी आहे, असा विचारही न करता कुटुंब नियोजन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तब्बल 44 वर्षापूर्वी जेव्हा समाज एवढा पुढारलेला नसताना दोघांनी हा निर्णय घेतला होता. त्यातून दोघांच्या आधुनिक विचारांमधील परिपक्वता अधोरेखित होते. अशा उच्‍च विचारांच्‍या कुटुंबात सुप्रिताईंची जडणघडण झाली. त्‍यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याच पूर्ण स्वातंत्र्य होते. अमुकच शिकलं पाहिजे, तमुकच झालं पाहिजे, अशी कसलीही सक्ती कधीच झाली नाही. न शिक्षणाबाबत, न लग्नाबाबत. त्‍यांच्‍या आयुष्याचे सगळे निर्णय त्‍यांनीच घेतले आणि विशेष म्हणजे त्‍यांचे आईबाबा आणि कुटुंबीय पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा,
- कॉजेलमध्‍ये होत्‍या खूप लाजाळू, मुख्‍यमंत्र्यांची मुलगी असूनसुद्धा बसने करत ये-जा...
- सदानंदरावांशी कशी झाली ओळख..?
- बाळासाहेब ठाकरेंच्‍या आहेत भाचसून...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...