आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Suresh Deshmukh Elected As A Pune Natya Parshid President

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी सुरेश देशमुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सुरेश देशमुख यांची निवड करण्यात आली असून ही निवड पाच वर्षांसाठी आहे. निवडणूक अधिकारी भाऊसाहेब भोईर यांनी येथे नाट्य परिषदेच्या पुणे शाखेची नवी कार्यकारिणी जाहीर केली. निवडणूक बिनविरोध पार पाडून एक नवा पायंडा नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने घालून दिल्याचे भोईर यांनी या वेळी नमूद केले.

नव्या कार्यकारिणीचा कार्यकाळ 2013 ते 2018 असा असून एकूण पंधरा जणांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी सुरेश देशमुख, दादा पासलकर व अविनाश देशमुख (उपाध्यक्ष), दीपक रेगे (प्रमुख कार्यवाह), मेघराज राजेभोसले (कोशाध्यक्ष), मकरंद टिल्लू व निकिता मोघे (संयुक्त कार्यवाह), तर डॉ. सतीश देसाई, कीर्ती शिलेदार, विजय वांकर, शुभांगी दामले, प्रमोद आडकर, दीपक काळे, अरुण पोमण व सत्यजित धांडेकर हे कार्यकारिणी सदस्य असतील.
नवीन कार्यकारिणीची लगेच बैठक होऊन त्यात राज काझी, प्रवीण बर्वे, संतोष चोरडिया, नंदू बांदल व अशोक जाधव यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक झाली. शशिकांत कुलकर्णी, प्रकाश पायगुडे व प्रदीपकुमार कांबळे यांची सन्माननीय सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. नाट्य परिषदेच्या एकूण 15 जागांसाठी सुरुवातीला 40 जणांनी अर्ज भरले होते. मात्र, सर्व रंगकर्मींनी एकत्रित प्रयत्न करून ही निवडणूक बिनविरोध केली.