आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरेश कलमाडींना ‘कमबॅक’चा विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘गेली 32 वर्षे मी लोकसभा किंवा राज्यसभेत कमबॅकच करत आलोय. या वेळीही नक्की कमबॅक करणार,’ असा विश्वास कॉँग्रेसचे निलंबित खासदार सुरेश कलमाडी यांनी बुधवारी व्यक्त केला.


पुणे फेस्टिव्हलचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.कलमाडी म्हणाले, ‘पुणे फेस्टिव्हलच्या गेल्या 25 वर्षात माझी प्रतिमा उंचावलेलीच आहे. त्यात या वेळी भर पडेल. यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने फेस्टिव्हलमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांशी त्याचा संबंध नाही’, असेही कलमाडी यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रसिध्द अभिनेत्री हेमा मालिनी उपस्थित होत्या.


‘फेस्टिव्हल’ची मेजवानी
* हेमामालिनीचे गणेश नृत्य आणि खास बॅले ‘राधा रासबिहारी’
* पंडित जसराज, पंडित हरिप्रसाद चौरसिया, सेल्वा गणेश, श्रीधर पार्थसारथी, रामकुमार मिश्रा, शुभंकर बॅनर्जी यांच्या मैफली
* जतिन-ललित यांची संगीत रजनी
* ऊर्मिला मातोंडकर, ईशा कोप्पीकर आदीं अभिनेत्रींचा लावणी महोत्सव
* उर्दू मुशायरा आणि हिंदी व मराठी हास्य कवींचे संमेलन
* बाराशे बैलगाड्यांची शर्यत
* व्हिंटेज कार रॅली, गोल्फ स्पर्धा